ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

दुचाकीस्वाराची उभ्या ट्रकला मागून धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

3.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बुरांडा कृषी विद्यालया जवळील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव वरून काम आटोपून आपल्या घरी परत जात असतांना एका दुचाकी स्वाराने उभ्या ट्रकला मागून धडक दिली.ही घटना आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला.

सदर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नारायण दौलत मुंगोले वय 55 वर्ष रा. हटवांजरी ता. मारेगाव असे आहे.

नारायण हे आज सायंकाळच्या सुमारास शेतातील फवारणीचे औषध आणण्यासाठी  हटवांजरी येथून मारेगाव येथे गेले होते. फवारणीचे औषध घेऊन गावाकडे परत येत असताना बुरांडा (ख) स्टॉप पासुन जवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून धडक बसली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. रस्त्याने ये- जा करणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.
सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर