ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

कुंभा व वेगाव येथे ताना पोळा मोठ्या उत्साहात साजरा.

89 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गावातील असंख्य लहान मुलांनी उत्कृष्ठ नंदी बैलाना सजवून वाढवली तान्या पोळ्याची शान.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील कुंभा व वेगाव येथे काल दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोज शुक्रवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दोन्ही गावामध्ये ताना पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कुंभा येथील व्यापारी मित्र मंडळ यांचे कडून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तान्या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.गावातील ग्राम पंचायत कार्यालयाच्या समोरील बाजार वाडीच्या भव्य पटांगणात आयोजन करण्यात आले होते.या तान्ळा पोळ्यांमध्ये गावातील लहान मुलांनी सहभाग घेवून नंदी बैलाला छान सजवून गावातील बाजारवाडी मध्ये आणले होते.


तान्हा पोळ्या मध्ये त्यांना लकी ड्रॉ मधून 10 बक्षीस,वेशभूषा व नंदी सजावट असे बक्षीस ठरवले जाते,आणि त्याचे वितरण करण्यात येत असते तसेच कालच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव ठाण्याचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची उपस्थिती लाभली तसेच कूंभा गावातील सरपंच अरविंदभाऊ ठाकरे,यांचे सह व्यापारी मित्र मंडळातील सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

तसेच वेगाव येथील ग्रामवासी यांचे तर्फे तान्या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.गावातील तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा ताना पोळा भरविण्यात आला असून यामध्ये गावातील असंख्य छोट्या मुलांनी आप आपले नंदीबैलची उत्कृषठरित्या सजावट करुण तान्या पोळ्यातील उपस्थीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वेगाव येथील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांन सह ग्रामवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर