ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कौतुकास्पद…
मनस्वी विशाल पिंपरे या 5 वर्षीय चिमुकलीने कोरले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव.

122 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मनस्वि ठरली जगातील सर्वात लहान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी मुलगी.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील पण सद्या कोंढवा बुद्रुक पुणे येथील रहिवासी मनस्वी विशाल पिंपरे वय वर्ष पाच वर्ष आठ महिन्याची असून ती गिनीज रेकॉर्ड करणारी जगातून पहिली ठरली आहे.

प्रशिक्षक विजय मलजी यांच्या लयबद्ध शिस्तीत व आई स्नेहा व वडील विशाल यांच्या अथक परिश्रमाच्या प्रयत्नातून हे यश संपादी त केले आहे.लिंबो स्केटिंग प्रकारच्या खेळात 25 मी लांब आणि अवघ्या 16.5 cm म्हणजे मोबाईलच्या उंचीच्या एवढ्या खालून मनस्वीने वैयक्तिक गिनीज रेकॉर्ड केले असून मनस्वी जगातील एकमेव मुलगी ठरली.

मनस्वीने अकरा वर्षांच्या मुलीचे आठ वर्षा पूर्वीचे रेकॉर्ड तोडले असून अवघ्या पाच वर्षाच्या वयात मनस्वीने विश्वविक्रम करून खेळ प्रकारात जगातील सर्वात लहान गिनीज रेकॉर्ड करणारी पहिली ठरली.मनस्वी सद्या कोंढवा बुद्रुक पुणे येथे वास्तवयास असून रॉक ऑन व्हील अकॉडमी मध्ये स्केटिंगचे धडे घेत असून प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे.


मनस्वी शहरात असली तरी बोटोणी गावाशी मनस्वीची नाळ कायम जुळलेली आहे.मनस्वीचे वडील एका पायाने अपंग असून हिंमतीच्या जोरावर आपल्या मुलीला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचविले हे एक पालक वर्गाला अभिमानाची बाब आहे. अपंग वडिलदेखील आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी अपंगत्व भुलून जनू तो शरीराने तंदुरुस्त असल्याचे  दाखवून मनस्वीचे मनोधैर्य वाढविताना पाहून अपंग नसल्याचे जाणवते.

मनस्वीने खेळण्या कुदण्याच्या वयात स्केटिंग खेळाची सुरुवात केली अवघ्या साडे तीन वर्षापासून स्केटिंग खेळाला सुरुवात करून तिने 74 सुवर्ण पदक 6 सिल्वर 6 ब्रांझ पदक 19 बुक ऑफ रेकॉर्ड तसेच जलतरण स्पर्ध्येत देखील रजत पदकाची मानकरी बनून अष्ठापैलू खेळाडू ठरली. यावर्षीचा शेर- ए हिंदुस्थान ‘किताबदेखील मिळाला आहे.दोन अडीच वर्षाच्या अथक परिश्रमाणे अनेक विक्रम आपल्या नावी करणाऱ्या  मनस्वीचा जन्म जनू विक्रमासाठीच झाला आहे.गावास्तरावर मनस्वीचे अभिनंदन होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर