ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मारेगावात पिवळं वादळ धडकल … ‘ येळकोट येळकोट , जय मल्हार ‘ च्या गर्जनेत धनगर समाजाने केले एकदिवसीय धरणे आंदोलन.

346 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

⏹️ धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी शासनाने न केल्यास धनगर समाज शासनाला सत्तेतुन बाहेर फेकेल-ऍड दिलीपभाऊ एडतकर.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव: आज गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर,2023 रोजी मारेगाव शहरात धनगरांचं पिवळं वादळ अखेर धडकलं.’ एकच मिशन धनगर आरक्षण’ , ‘ येळकोट येळकोट जय मल्हार ‘ च्या गर्जनेत धनगर समाजाने नगर पंचायत कार्यालय मारेगाव ते तहसील कार्यालय मारेगाव भव्य रॅली काढली या रॅलीत हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

महिलांची संख्या लक्षणीय होती.नंतर हा मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयाच्या समोर जाऊन पोहचला आणि तिथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले.धनगर समाजाचा संविधानाच्या अनुसुचित जमातीच्या सूचीमध्ये १९५६ पासून ३६ व्या क्रमांकावर समावेश असूनही आज पर्यंत शासनकर्त्या जमातीने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे.अनेक वर्षापासून घटनादत्त न्याय हक्क मागण्यासाठी धनगर समाजआंदोलणे, मोर्चे व उपोषण करीत आला आहेत.

विविध सरकारणे धनगर समाजाला आश्वस्त करून अनुसुचित जमातिच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो असे फक्त तोंडी सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नाकर्त्या सरकारने आजपर्यंत धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात केली नाही.महाराष्ट्रात धनगर समाज हा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे.मात्र समाज असंघटित
असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने धनगर समाजाचा फक्त मतदानासाठी फायदा करून घेतला.

हि गोष्ट आज समाजाने गांभिर्याने घेण्याची गरज आहे. त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज उपोषणे,रास्ता रोको आंदोलने, मोर्चे व धरणे आंदोलने करित आहे. एस टी आरक्षणाची अंमलबजावणी हि एवढी समाजाची रास्त मागणी असताना हे निगरगट्ठ सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करित नाही. देशात सर्व राज्यांमध्ये धनगर समाज विखुरलेला आहे. अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षण लागू केलेले आहेत.

महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे कि, जे धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून वंचित ठेऊन राहिलं आहे. त्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक व राजकिय दृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहेत.धनगर समाजातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणात तसेच विविध स्पर्धा परीक्षेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ते फक्त आणि फक्त धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळाले नाही म्हणून.रानावनात राहणाऱ्या या गरीब समाजाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने सर्वात जास्त फसविले आहे.

त्यामुळे धनगर समाजाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आहे त्यामुळे समाजाने आज धरणे दिले.मा प्रा संजय लव्हाळे सर, आशिष साबरे सर ,अतुल बोबडे, राजकुमार बोबडे, माणिकराव पांगुळ, अरविंद वखनोर,प्रफुल झाडे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मा ऍड दिलीपभाऊ एडतकर साहेब, साईनाथ बुच्चे साहेब तसेच पंडिले साहेब, शेरकी साहेब, महात्मे साहेब,उपस्थित होते.

शासनाने जर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अमलबजावणी केली नाही तर धनगर समाज शासनाच्या विरोधात मतदान करून शासनाला सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही असे मत प्रमुख मार्गदर्शक एडतकर साहेब यांनी केले.यावेळी धनगर समाजाने मा तहसीलदार यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निवेदन सादर केले.कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक आशिष साबरे सर यांनी केले तर प्रास्ताविक मा विलासराव शेरकी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी मदत केली.मारेगाव, वणी आणि झरी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर