ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

121 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ग्रामसेवक,कर्मचारी,संगणक परिचालक,ग्रामरोजगार सेवक यांच्यासह सरपंच परिषदही संपात

सुरेश पाचभाई मारेगाव,

महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करणाऱ्या सर्व कर्मचारी संघटना यामध्ये ग्रामसेवक युनियन सर्व,संगणक परिचालक संघटना,ग्रामरोजगार सेवक संघटना सर्व,ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सर्व तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्रीत रित्या विविध प्रलंबीत न्याय मागण्यासाठी सरकारचे लक्षवेध करण्यासाठी दि.१८ डिसेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ या तीन दिवसाचे ऐतिहासीक कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ग्रामपंचायत विकासाचा महत्वाचा भाग असुन सुध्दा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कर्मचारी यांच्या न्याय मागण्या सातत्याने प्रलंबीत ठेवल्या जात आहेत.त्याकरिता १८/१२/२०२३ ते २०/१२/२०२३ या तीन दिवसाचे कामबंद आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन डि.एन.ई.१३६ तालुका शाखा-मारेगांव अंतर्गत सर्व ग्रामसवेक व ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले आहेत.तसेच मारेगाव येथील पंचायत समिती समोर करण्यात आलेल्या काम बंद आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्याकरिता गावपातळीवरील ग्रामपंचायत कार्यालय बंद करण्यात आले.


या मध्ये सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक ऑपरेटर सहभागी झाले.असुन काम बंद आंदोलनात प्रभागनिहाय निधी, विमा संरक्षण, विभागातून सरपंच आमदार, सरपंच भवन, पीएफएमएस प्रणाली चीं तांत्रिक अडचण दूर करून धनादेश करावी देयके प्रदान करावी, ग्राम विकासाला किमान वार्षिक दहा लाख विकास निधी देण्यात यावे, पंधरा व्या वित्त आयोग निधीत वाढ करण्यात यावी.

आदी विकासाभिमुख प्रश्न घेवून काम बंद आंदोलन लक्ष वेधत असून ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या मागण्यासह सरपंच , ग्राम सेवक , ग्राम विकास अधिकारी , ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक, ग्रा. पं. कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्या घेवून आंदोलनात सहभागी झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर