ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव

एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा मारेगांव तालुक्याचा सुपरस्टार कलाकार डाॅ. विनोदकुमार हा जीवनाचा खडतर मार्गाने चालत आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून जीवनाचा गुळगुळीत डांबर रस्ता बनविणारा डाॅ. विनोदकुमार  आज कलेला कमर्शियल उद्देशाने घेऊन सेलिब्रिटी जीवन जगतोय, आज घडीला अंगी असलेल्या कलेला सामाजिकतेची किनार असल्याने समाजाती अनिष्ट प्रथा शेतकरी समस्या,

आमचे शैक्षणिक धोरण, राजकीय चुकीच्या धोरणाचा समाचार घेत आसुड ओढण्याचा प्रयत्न करित व्यवस्थेला जाग करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याने डाॅ.  विनोदकुमार सदाशीव आदे सर्वसामान्य नागरीकात प्रसिद्ध आहे, आज २६ जुलैला त्यांचा जन्मदिवस असून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी उपेक्षा त्याच चाहते मनोमन करित आहे.

रांगोळीकार, चित्रकार, मुर्तिकार, शिल्पकार,गितकार, पटकथाकार, नकलाकार, कवी, लेखक, पत्रकार, शंभर पेक्षा जास्त कला असलेले डाॅ. विनोदकुमार आदे हे एक हळव्या मनाच व्यक्तीमत्व असून ते आई वडीलाची सेवा सुद्धा श्रावणबाळा सारखा करीत आहे आज च्या परिस्थिती केवळ आईवडीलाच्या प्रति प्रेमाचा देखावा करणारे असंख्ये अपत्ये समाजात आहे मात्र त्यापैकी अनेकाची म्हातारे आईवडिल वृद्धाश्रमात जीवन कंठत आहे.

मात्र डाॅ. विनोदकुमारचे वडील कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना उपराजधानीतील रुग्नालयात करित असताना वडीलांसाठी सर्व कार्यक्रमे रद्द करून वडिलाच्या प्रकृतीवर डोळ्यात तेल टाकून सुश्रृशा करणारे डाॅ. विनोदकुमार खऱ्या अर्थाने आमचा श्रावण ठरतोय अशा शतकी कला अंगी असणार्‍या डाॅ. विनोदकुमार आज आजारी वडीलाच्या  सेवेत रुजु असून त्याला अंगी असणारी कला स्वस्थ बसू देत नाही तो वेळेत वेळ काढून ठरलेले कार्यक्रम सादर करून कार्यक्रम संपताच आजारी वडीलाच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवण्यासाठी नागपूर गाठतोय अशा हळव्या आईवडील प्रेमी कलाकार यांच्या कला व वडीला प्रती असलेल्या आपुलकीला सलाम

वडिलाप्रति कृत्यज्ञता व त्यांच्या बलिदानाचे उपकार बाळगत आगष्ट महीण्यात डाॅ. विनोदकुमार आदे यांचा दुसरा काव्य संग्रह प्रकाशित होणार आहे काव्य संग्रहाचे नाव बाप असून पहीले काव्य संग्रह टुकार हे प्रकाशित आहे.जर बालपणी आई वडीलांनी उन वारा पाऊस पाणी व आग यापासून लेकराच संरक्षण केले नसत, शाळेत नाव नोंदवल नसत तर मी हुशार झालो नसतो. त्याच्या कार्याची प्रचिती बाप ह्या काव्य संग्रहात प्रत्येक कवितेत रसिकांना पाहावयास मिळणार आहे.
आई वडीलाच्या प्रेमातून शिकवणीतून आज कलाक्षेत्रात उत्कर्षाचा झेंडा लावणारे डाॅ. विनोदकुमार  यांचा जन्मदिवसा निमित्त हार्दिक सदिच्छा .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर