Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मुक्टा येथे राष्ट्रसंतांचा पुण्यस्मरण सोहळा

सुरेश पाचभाई मारेगाव,

मानवतेचे महान पुजारी,विश्वशांतीचे पुरस्कर्ते,आणि राष्ट्रधर्माचे संस्थापक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यस्मरण सोहळा मुक्टा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन तीन दिवस चाललेल्या सोहळ्यामध्ये भजन कीर्तन ध्यान प्रार्थना अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा मुक्ता येथे गुरुदेव सेवा मंडळ तर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यामध्ये दि.26 जानेवारीला सकाळी चार ते पाच ग्रामसफाई पाच ते साडेपाच तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अभ्यंग स्नान व पूजन,दि.27 तारखेला चा रात्री नऊ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.श्री गजानन महाराज सुरकर यांचे जाहीर कीर्तन

त्यानंतर दिनांक 28 जानेवारी 2024 रोज रविवारला दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी काल्याचे किर्तन कीर्तनकार होत्या ह.भ.प. वंदनाताई गणोरकर ग्रामगीताचार्य गुरुकुंज आश्रम मोझरी.या तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे आयोजन श्री.गुरुदेव सेवा मंडळ मुक्टा, श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ मुक्टा आणि समस्त ग्रामवासी मुक्टा यांनी केले होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!