ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले
करंजी-मारेगाव महामार्गांवर घडला थरार.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ–वणी राज्य महामार्गावर असलेल्या नायरा पेट्रोलपंप मारेगाव जवळ थरार,सिनेस्टाईलने लूटमार.

गजानन आसुटकर मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील बंगाली डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 हे प्रॅक्टिस करून मारेगाव येथे घरी परत येत असतांना अज्ञात चार युवकांनी बंदूक-चाकूचा धाक दाखवित पावणे चार लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना काल दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली.

डॉ.प्रभास हाजरा हे मारेगाव येथील रहिवासी असून मारेगांव तालुक्यातील नवरगाव येथे त्यांचा दवाखाना आहे. ते काल सोमवारला सायंकाळच्या सुमारास दवाखाना बंद करून अँक्टिवा मोटर सायकल क्रमांक MH.29BB.2867 ने मारेगाव येथे परतत असताना त्यांच्या मागुन पांढऱ्या रंगाची स्विप्ट कार MH.31**6307 ही त्यांच्या ऍक्टिवा समोर आडवी लावली.

कारणे आलेल्या चौघांनी यवतमाळ -वणी राज्य महामार्गावर असलेल्या नायरा पेट्रोलपंप समोर त्यांना अडवीले आणि कार मध्ये बसविले व त्यांना चाकू आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला व त्यांचेकडून नगदी 24000 व 15 हजार रुपयांची सोन्याची अंगठी आणि 30 हजार रुपयांची सोन्याची चैन,सह मोबाईल ताब्यात घेतला व या युवकांनी डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा यांना तब्बल 2.5 लाखाची मागणी केली.

पैसे दिले नाही तर अपहरण करून हत्या करण्याची धमकी दिली.आणि करंजीकडे नेले सुमारे दोन तास राज्य महामार्गावर चाललेल्या या थरारात डॉ.हाजरा हे कमालीचे घाबरले.त्यांनी भिती मुळे 2.5 लाख रुपये देण्यास होकार दिला आणि त्यांनी वणी येथील मित्रा कडून व्यवस्था केली.त्यांनी कारमध्ये कोंबून डॉक्टरला घेवुन वणी येथे गेले.वणीत पोहचल्या नंतर कारच्या आतील एका युवकाने कारचा काच थोडा उघडला आणि मित्राकडून बोलाविलेले रोख 2.5 लाख रुपये ताब्यात घेतले.

काही अंतरावर त्यांनी डॉ.हाजरा यांना सोडून कारसह युवक पसार झाले.असून त्यांच्या जवळील नगदी 24000 रु, सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी किं अं 15000, गळ्यातील सोन्याची चेन वजन 12 ग्रम किं 30000 रूपये हिसकावून त्यांना मारण्याची धमकी देवुन 2500000 रुपयाची मागणी केली.या घटणे मुळे मारेगाव तालुक्यात दहशतीसह एकच खळबळ उडाली आहे.

किमान दोन ते अडीच तासाच्या ह्या लुटमारी संदर्भात मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमा विरोधात बळजबरीने अपहरण करणे आणि गंभीर दुखापत करणे,शस्र बाळगून जिवानिशी मारण्याची धमकी देणे व लूटमार करणे या बाबत.

कलम 392,363,364 (अ),3/25, 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणे अत्यंत गरजेचे झाले असुन या सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजेश पुरी व यांचे पथक करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर