ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अतिवृष्टीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.महापूर व अतिवृष्टी झाली. सगळीकडे नदी व नाल्याना ओसांडून पूर आलेला होता. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते अनेक शेतकऱ्याची शेती ही पुराणे खरडून नेली आहे.आधीच शेतकऱ्याला दुबार-तीबार पेरणीची वेळ आली होती.

तालुक्यातील नाल्याकाठच्या व इतरही बहुतांश शेतातील पीक पाण्याखाली होते ज्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतातील पीक हे लहान असल्याने व त्यात पाणी साचून राहल्याने ते पीक सुद्धा मेले होते.अतिवृष्टीने शेतातील पिकांचे सतत नुकसान होत गेले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित मदत जमा करा.

अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदनातून देण्यात आला आहे.यावर्षी सततच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतामध्ये वारंवार पेरणी करूनही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हतबल व हावदिल झालेला आहे. अति पावसाने उत्पन्नात मोठया प्रमाणावर घट होणार आहे.

देशाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. अशा अवस्थेत शेतकरी आत्महत्येकडे वळू शकतो अशी भीतीही व्यक्ती केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी आपले जीवनही संपविले आहे. प्रशासन निद्रावस्थेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होतं आहे.शेतकऱ्यांसाठी असलेली ही मदत 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

अन्यथा शेतकऱ्यांसोबत मारेगाव येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे,तालुका अध्यक्ष भारत मत्ते, तालुका उपाध्यक्ष दयाल रोगे, रायुकाचे नितीन गोडे, शहराध्यक्ष मुन्ना शेख, नगरसेवक हेमंत नरांजे, अमोल मत्ते, अतुल पचारे, सुनील आत्राम, आशिष येरणे, महेश पाटील, गोलू पालकर, अभिजित जुमडे, रोहित कोसरे, शुभम ठावरी, तन्वीर शेख, विवेक बोकडे, संतोष बल्की यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर