ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मनस्वी पिंपरे ही महाराष्ट्र खेल पुरस्काराने सन्मानित

166 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यांतील मुळगाव चिं. बोटोणी येथील सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे हिला पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र खेल पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. मनस्वीने 2023 या वर्षामध्ये मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तथा चेन्नई येथे झालेल्या 61 व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये  महाराष्ट्र राज्याकरिता कांस्य पदक मिळविले होते.

तिच्या या स्केटिंग मधील उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेत,महाराष्ट्र खेल पुरस्कार समिती तर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र खेल पुरस्कार 2023 (उत्कृष्ठ खेळाडू) बहाल करण्यात आला,वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर, प्रमुख अतिथी माजी नगरसेविका रंजनाताई टिळेकर ,वृषालींताई कामठे तसेच भाजपा नेते राजाभाऊ कदम उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे निवेदन मंगेश कंक यांनी केले तर प्रशिक्षक विजय मलजी सर यांनी प्रास्ताविक केले,या पुरस्कार सोबत मनस्वीला बेस्ट प्लेअर ऑफ द ईअर 2023 ने सन्मानित करण्यात आले. तिने आतापर्यंत एकूण 78 विविध स्केटिंग स्पर्धा मधून 87 सुवर्ण पदके, 11 रजत पदके आणि 10 कांस्य पदके मिळवली आहे. 27 बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि 15 विविध पुरस्कार अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे.



ती सध्या रॉक व्हील स्केटिंग अकॅडमी येथे प्रशिक्षक विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शना खाली स्केटिंग प्रशिक्षण घेत असून,मारुती बधे मेमोरियल स्कूल कोंढवा बुद्रुक येथे शिकत आहे , तिला मिळालेल्या पुरस्कार करीता तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर