ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

भरधाव कारची दुचाकीला धडक दोन युवक गंभीर जखमी

110 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्य महामार्गावरील करणवाडी  पेट्रोल पंप जवळील घटना

गजानन आसुटकर मारेगांव,

भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.ही घटना आज दि.19 मार्च 2024 रोज मंगळवारला सायंकाळी 6.30 च्या दरम्यान घडली.

जखमी झालेल्या युवकांचे नाव प्रथमेश कैलास पिदूरकर अंदाजे वय 18 वर्ष व सागर रामलाल लावे अंदाजे वय 20 वर्ष दोघेही रा. ता.मारेगाव असे असून यांचेवर मारेगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,
मारेगाव येथील दोन युवक त्यांच्या दुचाकीने मारेगाव वरून सायंकाळच्या सुमारास  करणवाडीकडे जात होते.त्याचवेळी करंजीकडून MH- 34 BR- 0642 ही कार वणीकडे जात होती.मारेगाव ते करणवाडी दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोघेही युवक रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.दोघांनाही गंभीर इजा झाली.

सदर घटना घडताच या रस्त्याने येजा करणाऱ्या काही नागरिकांनी याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली.माहिती मिळतात मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी जखमीना साई मित्र परिवाच्या ॲम्बुलन्सने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयत दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर