ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मारेगाव येथे शनिवारी लोकन्यायालयाचे आयोजन

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पक्षकारांनी लाभ घेण्याचे मारेगाव न्यायाधीश एन. पि. वासाडे यांचे आवाहन

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मारेगाव तालुका विधी सेवा समिती व मारेगाव न्यायालयाच्या वतीने शनिवारी दि. ०७/०५/२०२२ मारेगाव न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होउन पक्षकारांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारेगाव तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधिश मारेगाव श्री. एन.पि. वासाडे यांनी केले आहे.

न्यायदानाची प्रक्रिया क्लिष्ट आहे. न्यायालयात असंख्य प्रकरणे तुंबून पडली आहेत. त्यामुळे गोरगरीबांना जलद गतीने न्याय देण्याचा उद्देश साध्य होत नाही. पक्षकारांची वेळ व पैशाची बचत करण्यासाठी लोकन्यायालय उपयुक्त असून याद्वारे सामोपचार तडजोडीतून न्यायालयीन प्रकरणात दोन्ही बाजूंचे समाधान होउ शकते. न्यायालयावरचा भारे कमी होउन गोरगरीबांना समाधानाने व लवकर न्याय मिळू शकतो. त्यामुळे लोक न्यायालयाकडे लोकांना कल वाढला आहे.

या प्रक्रियेत लोकांमध्ये लोकन्यायालया विषयी अधिक विश्वास निर्माण झाल्यास लोकन्यायालयाची चळवळ अधिक बळकट होउ शकते, असे मत न्यायाधीश एन. पी. वासाडे यांनी व्यक्त केले. शनीवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायलयात मोटार वाहन कायदा अंतर्गततची प्रकरणे निगोशिएबल इन्टुमेंट अॅक्ट कायद्या अंतर्गतची कमल १३८ ची प्रकरणे बँक व फायनान्स कंपनीचे वसुली प्रकरणे, भुसंपादन प्रकरणासह शेतजमिनी विषयक प्रकरणे, कर भरणा, वीज बिल पाणी बील प्रकरणासह फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, वैवाहित व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश राहणारे आहे.

या न्यायालयासाठी न्यायाधीश, वकील व सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असलेले सहा पॅनल्स तयार करण्यात आले आहे. या लोक न्यायालयाला पक्षकारांनी सहयोग द्यावा, असे आवाहन मारेगाव न्यायाधीश एन.पि. वासाडे यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर