ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळण महत्वाचा,दीपक रंगारी.

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव येथील गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

भाषा लेखन करतांना तसेच भाषेचा इतरत्र वापर करतांना प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळणे महत्वाचे आहे असे उद्गार मराठी दीपक रंगारी यांनी काढले. ते दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोज मंगळवारला मारेगाव येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष तथा क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराणा होते. तर उदघाटक म्हणून मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की,दुसरे मार्गदर्शक म्हणून मा.सुनयना येवतकर, महिला जिल्हाधक्ष महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद यवतमाळ, प्रमुख अतिथी म्हणून गौरीशंकर खुराणा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव,

जनार्दन खंडेराव पोलीस निरीक्षक मारेगाव, भास्कर धानफुले माजी प्राचार्य, बाजार समिती संचालक यादवराव काळे, खडसे, प्रफुल विखणकर, सरपंच रविराज चंदनखेडे, जनहित कल्याण संघटना मारेगावचे अध्यक्ष समीर कुळमेथे, उपाध्यक्ष रॉयल सय्यद, महिला अध्यक्ष कविताताई मडावी, सचिव सुवर्णाताई खामणकर,रवी पोटे,प्रमोद लोणारे,तुळशीराम कुमरे,अंकुश माफूर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना दीपक रंगारी म्हणाले की,शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुले लिखानामध्ये नेहमीच समोर राहिलेले आहे.आपण अनेकदा शब्द एक वाचतो आणि दुसराच लिहितो.मराठी व्याकरणमधील बारकावे समझून घेणेही फार महत्वाचे आहे.अचूक शब्द लिहिताना अनेक लोकांकडून मोठया प्रमाणात चुका होतात असे सांगतांना त्यांनी गुणगौरवसाठी आलेल्या 10 वी आणि 12 वीच्या मुलांचा क्लासच घ्यायला सुरुवात केली.त्यांना ऱ्हस्व, दीर्घ आणि व्याकरनाचे नियम यावर प्रकाश टाकत भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी सुनयना येवतकर यांनीही महिलांनी सबलीकरणाचे धडे घ्यावे, पुरातन रूढी तसेच परंपरेच्या मागे न लागता पुरोगामी पद्धतीने जीवन जगावे असे सांगितले.तसेच अन्याय व अत्याचार कधीच सहन करू नये.जशास तसेच उत्तर देण्यास महिलांनी तत्पर असले पाहिजे असे सांगितले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोमेन्टो आणि संविधानाचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत,प्रास्ताविक सुमित गेडाम तर आभार सुरेश नाखले यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील 43 शाळांचे विद्यार्थी,पालक शिक्षक आणि मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरोगामी पत्रकार संघाचे मोरेश्वर ठाकरे,सुमित हेपट,गजानन देवाळकर,आनंद नक्षणे,धनराज खंडरे,सुरेश पाचभाई,गजानन आसूटकर,भैय्या कनाके,शरद खापणे,प्रफुल ठाकरे यांनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर