ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

झरी तालुक्यात निनादला शिट्टीचा आवाज

225 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मुकुटबन येथे भव्य पदयात्रा

ज्येष्ठ नागरिक मंडळ व बँक अभिकर्ते, कर्मचारी यांचा संजय खाडे यांना पाठिंबा

तालुका प्रतिनिधी झरी

झरी – सोमवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा मुकुटबन परिसरात प्रचार दौरा झाला. मुकुटबन,अडेगाव,वेळद, खडकी,खातेरा,येडशी या गावात प्रचार ताफा पोहोचला.मुकुटबन येथील रॅलीला हजारो लोकांनी सहभाग घेत संजय खाडे यांना पाठिंबा दर्शवला.यावेळी विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ,चिखलगाव यांनी संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.यावेळी सुधाकर गारगाटे,रमेश सुंकुरवार, दिगंबर गौरकर, अशोक झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमोद वासेकर वासुदेवराव विधाते, तेजराज बोढे, अशोकराव चिकटे,राजू अंकितवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मुकुटबन येथून प्रचाराला सुरुवात झाली. मुकुटबन येथील रहिवाशांनी वाजत गाजत संजय खाडे यांचे स्वागत केले. मुकुटबन येथे वाजत गाजत भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शिट्टीच्या आवाजाने संपूर्ण मुकुटबन दणाणून गेले. रॅलीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मतदारांचा समावेश होता. त्यानंतर कॉर्नर सभा झाली. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेरकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर प्रचार ताफा अडेगाव, वेळद, खडकी, खातेरा, येडशी या गावात पोहोचला.

संजय खाडे यांच्या मदतीला धावले बँक अभिकर्ते व कर्मचारी
संजय खाडे यांनी एकाही कर्मचारी किंवा एजंटकडून कोणत्याही प्रकारचे डोनेशन न स्वीकारता केवळ कर्तृत्वावर शेकडो कर्मचाऱ्यांना रोजगार दिला.त्यामुळे आम्ही कर्मचारी संजय खाडे यांचा प्रचार करणार असे पतसंस्थेतील कर्मचारी आणि अभिकर्ते यांनी जाहीर केले. यावेळी संजय खाडे सर्वांचे आभार मानत माझे दोनशे एजंट आणि 45 कर्मचारी जनसामान्यात जाऊन प्रचार करतील, असा विश्वास व्यक्त केला.

मंगळवारी संजय खाडे यांचा लाठी-शिंदोला सर्कलचा दौरा आहे. मंदर, केसुर्ली, चारगाव, वारगाव, पुरड, पुनवट, नायगाव, सावंगी, चिंचोली, शिवणी, येनाडी, कोलगाव, साखरा, माथोली, कैलाशनगर इत्यादी गावांचा दौरा आहे. कैलाशनगर येथे प्रचार सभा घेतली जाणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर