ब्रेकिंग न्यूज
⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…
SP News Maregaon

संजय खाडे यांच्या प्रचाराचे वादळ मार्डी सर्कलमध्ये,कॉर्नर सभेतून जोरदार टिका

180 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का करतो? संजय खाडे यांचा सवाल

विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्याचा खाडे यांना पाठिंबा

प्रमोद रा. मेश्राम मारेगाव

मारेगाव:- काल दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोज बुधवारला अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा मार्डी सर्कलमध्ये प्रचाराचा झंझावात दिसून आला. सकाळी 8 वाजता वनोजा देवी पासून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर गोरज, दांडगाव, आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण, कानडा येथे दौरा करीत मार्डी येथे कॉर्नर सभेने मार्डी सर्कलच्या प्रचाराची सांगता झाली.

त्यानंतर संजय खाडे यांचा झरी येथे दौरा झाला. बिरसा मुंडा चौकात कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. मार्डी व झरी येथील प्रचार सभेत माजी आमदार विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान विविध आदिवासी संघटना व धनगर समाजाच्या नेत्यांनी संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.



सकाळी वनोजा देवी येथे देवीचे दर्शन घेऊन संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर प्रचार ताफा गोरज व दांडगाव येथे पोहोचला. तिथे भव्य रॅली काढण्यात आली. ढोलताशाच्या गजरात गावक-यांनी खाडे यांचे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून संजय खाडे यांना विजयाचा आशीर्वाद दिला. रॅलीत संजय खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रचार ताफा आपटी, मुक्टा, हिवरा, कानडा, शिवणी धोबे, चनोडा, चोपण, कानडा येथे दौरा करीत मार्डी येथे कॉर्नर सभा पार पडली.

शेतकरी सुखी असेल तर आत्महत्या का ? – संजय खाडे
भाजपच्या 10 वर्षांच्या काळात मतदारसंघात जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही. शेतक-यांना न्याय मिळाला नाही. शेतक-यांना वीज मिळत नाही. ग्रामीण भागात बसची समस्या आहे. बेरोजगारांची फौज परिसरात वाढत आहे. ग्रामीण भागातील रस्त्याची समस्या आहे. मारेगाव तालुक्यात शेतक-यांच्या सर्वांधिक आत्महत्या आहे.

शेतकरी जर सुखी असता तर त्याला आत्महत्या का करावी लागते, असा सवाल त्यांनी सभेत उपस्थित केला. सभेत बोलताना नरेंद्र ठाकरे म्हणाले की संजय खाडे हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे.यावेळी काँग्रेस निवडणुकीत नाही.त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता नाराज आहे. काँग्रेस जिवंत राहण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता खाडे यांच्या पाठिशी उभा राहिल,असा विश्वास त्यांनी सभेत व्यक्त केला.

झरी येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून कॉर्नर सभेला सुरुवात झाली. येथे संजय खाडे यांनी आदिवासी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. मतदारसंघात अनेक मोठमोठाले विकासाचे दावे होत आहेत. मात्र अजूनही झरीसारख्या दुर्गम भागात, आदिवासी पोडात पुरेशा सोयी सुविधा अद्यापही पोहचल्या नाही. शिक्षण, आरोग्य सेवा, रस्ते, वीज, स्वच्छ पाणी या मूलभूत सुविधादेखील त्यांना मिळत नाही. आरोग्यासेवेसाठी त्यांना आजही बाहेरगावी जावे लागते असे ते म्हणाले.

विविध आदिवासी संघटना व धनगर नेत्याचा पाठिंबा
विविध आदिवासी संघटनांचा संजय खाडे यांना पाठिंबा वाढत आहे. गोंडवाना संग्राम पार्टीचे किशोर पंधरे, भारत मडावी, शांताराम दडांजे, गोंडवाना टारगर्स पार्टीचे तुळशीराम मंदाळे व सहकारी तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे रवि गेडाम इत्यादी नेत्यांनी संजय खाडे यांची प्रचार कार्यालयात भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. तर धनगर समाजाचे नेते व खंडोबा वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग पंडिले यांनी संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.ते त्यांच्या समाजबांधवासह संजय खाडे यांचा प्रचारात सामील झाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर