ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

वीज पडून महिलेचा मृत्यू

3.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील केगांव (गोधणी) येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

शेतामधून घरी परतत असताना रस्त्यात अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील केगाव (गोधणी) येथे घडली.ही घटना आज दि. 27 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली.विजेने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सौ.मेघा गणपत पानघाटे वय अंदाजे 45 वर्ष रा.केगाव असे आहे.

केगाव येथील गणपत पानघाटे यांचे कडे 4 एकर शेती आहे व काही  शेती त्यांनी ठेक्याने गोधनी शिवारात केलेली होती.त्यांची पत्नी आज शेतामध्ये कापूस वेचण्याकरिता एका महिले सह गोधनी शेत शिवारात गेली होती. शेतामधून घरी परतत असताना रस्त्यात असलेल्या डाखरे यांच्या शेताजवळ आली असता तिच्या अंगावर वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

तर सोबतची एक महिला जखमी झाली आहे.जखमी महिलेला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले असुन.मृत महिलेच्या पश्चात पती,एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर