ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

वाईट उद्देशाने घरात घुसला
जोराने ओरडताच उठून पळाला

2.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

रात्रीची वेळ,अंदाजे ११ वाजलेले.लाईट गेलेली.घरात आजी,आणि दोन बहिणी झोपलेल्या होत्या.लघुशंकेसाठी एक बहीण उठली.आणि लघुशंका आटोपून घरात येत असतांना अचानक वीज आली.आणि समोर बघते तो काय? गावातीलच एक नराधम अंगावरील कपडे काढून घरात घुसला होता.मुलीने जोरात आरडाओरडा करताच तो तिथून पळाला.

सदर घटना तालुक्यातील एका गावात दि.२७ डिसेंबरच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. सदर घटनेची तक्रार होताच संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील एका गावात एक मुलगी आपल्या वडील,आजी आणि बहिणीसोबत राहते.त्यांच्या घराचे काम सुरु असल्यामुळे बांधकामाचे बाजूला टिन आणि ताटव्याचे शेड करून राहते.रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून वडील बाजूच्या गोठ्यात झोपायला गेले.

आणि दोन मुली आपल्या आजीसोबत टिन आणि ताटव्याच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या.रात्री ११ च्या दरम्यान एक मुलगी लघुशंकेसाठी उठली.त्यावेळी वीज गेलेली होती. लघुशंका करून घरात येत असतांना अचानक वीज आली.त्यावेळी गावातीलच यशवंत रघु आत्राम वय २३ वर्षे हा नग्न अवस्थेत घरात घुसून तक्रारदार तसेच तिच्या बहिणीकडे वाईट उद्देशाने जात हात लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच सदर मुलगी जोरात ओरडली.

मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच वडील धावत तेथे आले तेव्हा संशयित आरोपी यशवंत रघु आत्राम हा तिथून पळाला.दि.२८ डिसेंबरला सदर मुलीने आपल्या आईवडीलासोबत मारेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.पोलिसांनी भा. न्या. सं. कलम ३३३, ७९ नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार संजय सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर