ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आमदार संजय देरकर यांच्या हस्ते खरीप पीक कर्जाचे वाटप

1.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवरगाव आणि सगणापूर संस्थेतर्फे करण्यात आले वाटप

सुरेश पाचभाई मारेगाव 

नवरगाव आणि सगणापूर येथील विविध कार्यकारी संस्थेचे कार्यालयात आज दिनांक 20 मे 2025 रोज मंगळवारला संस्थेच्या सभासदाना चालू वर्षा करिता खरीप पीक कर्जवाटपाचा शुभारंभ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे उपाध्यक्ष संजयभाऊ देरकर यांचे हस्ते करण्यात आले.

विविध का.सह.संस्था नवरगाव आणि आदिवासी सहकारी संस्था सगणापूर येथील 262 सभासदांना 2 कोटी 21 लाख 96 हजार रुपये, कर्जाचे वाटप करण्यात आले. नवरगाव आणि आदिवासी सहकारी संस्था सगणापूर कार्य क्षेत्रातील शेतकरी सभासदांना या वर्षी सुरू होणाऱ्या खरीप पीक हंगामात बी बियाणे,खते आदी शेतीपयोगी साहित्य शेतकरी सभासदांना खरेदी करता यावे.

त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने साधारणतः मे महिन्याला कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न असतो. यावेळी नवरगाव सोसायटीचे अध्यक्ष संदीप आस्वले, उपाध्यक्ष विजय बोबडे, महादेव खंडरे,गुलाबराव कावडे ,चंद्रभान मडावी,युवराज आस्वले, सगणापूर सोसायटीचे अध्यक्ष हनुमान तोडासे,संतोष मडावी,युवराज घोसले, प्रवीण राऊत,विनोद घोसले,हंसराज झाडे

पेंढरी सोसायटीचे दादाराव टेकाम,निरीक्षक पाचभाई साहेब,व्यवस्थापक येरमे साहेब.मिलिंद काकडे रोखपाल, प्रफुल सोनुले,संकेत मस्की सेक्रेटरी जंगेवार साहेब,मारोती सोनुले कर्मचारी तसेच सर्व संचालक उपस्थित होते.तसेच सर्व नवरगाव,हिवरी,सगणापूर, म्हैसडोडका,अर्जुनी, रायपूर केगांव येथील कर्जदार सभासद हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर