ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये: कृषि विभागाचे आवाहन

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात यावर्षी एकूण ४४७९० हे.क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यापैकी साधारणतः ३३३८० हे. क्षेत्र कापुस पिकाखाली, ५००० हे. क्षेत्र सोयाबीन पिकाचे, ६३६२ हे. क्षेत्र तूर पिकाचे व उर्वरीत क्षेत्रावर चारा, ज्वारी व इतर किरकोळ पिके पेरणी होण्याचा अंदाज आहे.गेल्यावर्षी सोयाबीन पिकाची घटलेली उत्पादकता पाहता यावर्षी सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात घट होऊन कापुस पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांकरिता खरीप हंगाम सुखकर व यशस्वी व्हावा यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय मारेगाव मार्फत गावोगावी खरीप हंगाम पूर्व नियोजन गावबैठका,उगवणक्षमता तपासणी व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिके इ. मोहिमा सुरू आहेत.पुरेसा म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय साधारणतः ४ ते ६ इंच जमीन ओली झाल्याशिवाय पेरणी करु नये.

तसेच पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासून व बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.यावर्षी मान्सूनवर एल निनो चा प्रभाव बघता पेरणी करतांना उताराला आडवी तसेच रुंद सरी वरंबा किंवा बेडवर टोकन पद्धतीनेच करावी जेणेकरून मूलस्थानी जलसंधारण होऊन प्रतिकुल परिस्थितीत पिके तग धरतील. असे आवाहन प्र.तालुका कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर