ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

वारकरी,महानुभव आदी चळवळींनी मराठीची समृद्धी- सुनील इंदुवामन ठाकरे

505 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

श्री.रामकृष्ण विवेकानंद मंडळात मराठी भाषा गौरवदिन साजरा

वणी:  खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं.संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. असे प्रतिपादन स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळात मराठी भाषा गौरवदिन साजरा झाला.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विजया देवाळकर होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक भगवान ठमके यांनी केले.यावेळी विचारपिठावर अनंत बेसेकर, भरत मालेकर, देवेंद्र राजगडकर, रवींद्र गुल्हाने हे शिक्षक उपस्थित होते.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, केवळ मराठीच नव्हे तर कोणत्याच भाषेत शुद्ध किंवा अशुद्ध हा प्रकार नसतो. ती एकतर प्रमाण असते किंवा बोली असते. माकडाचा माणूस झाल्यानंतर कितीतरी काळाने तो बोलायला लागला.मग त्याच्या लाखो वर्षानंतर लिपी आली.म्हणून आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. कालांतराने लिहिणेही सहज होईल.

आपल्या अध्यक्षीय भाषणात विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजया देवाळकर यांनी आपली भूमिका मांडली. या भाषेला समृद्ध करण्यात कुसुमाग्रजांसह सर्वच मराठी लिहिणाऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे.मराठीला समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

याप्रसंगी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या प्रतिनिधींनी ‘शेतकरी विरोधी कायदे’ हे पुस्तक वाचनालयाला भेट दिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,लिपिक अमर पेटकर आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत. संचालन आणि प्रास्ताविक ग्रंथपाल सुरेंद्र विधाते यांनी केले.आभार शिक्षक देवेंद्र राजगडकर यांनी मानलेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर