ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मांगरुळ येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू

119 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गरीब विधवेवर कोसळले दुःख

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

शेतामध्ये चरत असलेल्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज दि.19 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास घडली.या घटनेने एका विधवा महिला शेतक-यावर संकट कोसळले आहे.

मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील विधवा महिला श्रीमती शकुंतला माधवराव खडसे यांचे कडे 4 एकर शेती असून या महिलेचा बैल शेतामध्ये चरत होता.त्यावेळी अचानक सापाने बैलाला दंश केला.त्यामुळे बैल जागेवरच दगावल्याने गरीब आणि विधवा असलेल्या या महिलेवर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

अचानक आलेल्या संकटामुळे या महिला शेतक-यावर शेतीची कामे कशी करावी असा प्रश्न उभा राहिला आहे.बैलाच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूची तक्रार करण्यात आली.लगेचच तलाठी यांनी या घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांना सादर करण्यात आलेला आहे. बैलाच्या मृत्यूची आर्थिक मदत त्वरित मिळावी अशी मागणी विधवा महिला शेतकरी यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर