ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मारेगावात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

परिवर्तन विचारांची प्रेरणादायी जागृती

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव येथे जागतिक समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती परिवर्तन विचारांच्या प्रभावी वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. जिजाऊ चौक परिसरात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला माळी महासंघ, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच महिला-पुरुषांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून फुले दाम्पत्यांच्या क्रांतिकारी कार्याचा गौरव करत बहुजन समाजासाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक परिवर्तनाचा पाया रचल्याचे अधोरेखित केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सोयाम, नारायण शेंडे, मराठा सेवा संघाचे विभागीय उपाध्यक्ष इंजि. अनंत मांडवकर, मार्गदर्शक अनामिक बोढे, माळी महासंघाचे कार्तिक शेंडे, अक्षय सोनुले, राजू शेंडे आदींसह अनेक मान्यवर व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपूर्ण कार्यक्रमात परिवर्तन, शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश देत महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणादायी उजळणी करण्यात आली. मारेगावातील हा सोहळा समाजजागृतीचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर