ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुकटा येथील शेतकर्याच्या मुलीने JEE B.arch मध्ये मारली बाजी.

116 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कु.प्रणाली विजय ढवस JEE B.arch परीक्षेत 99.73 % टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील मुकटा येथील कु.प्रणाली विजय ढवस हिने JEE B arch परीक्षेत 99.73 % टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर.प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

कु.प्रणाली ही आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे 12 व्या वर्गात विज्ञान शाखेत मागच्या वर्षी शिकत होती.तीला 86.83% मार्क होते.तिचा कॉलेज मधुन 3 रा नंबर होता.तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथे झाले.

तालुक्यातील मुकटा येथील शेतकऱ्यांच्या मुलीने JEE B.arch परीक्षेत घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.आई-वडील शेतकरी असून त्यांचे कडे 7 एकर शेती आहे.

घरात कुणीही जास्त प्रमाणात सुशिक्षित नसताना दैदीप्मान यश संपादन करणाऱ्या प्रणाली चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.प्रणाली हीचा भाऊ लोकेश विजय ढवस हा 8 व्या वर्गात वरोरा येथे शिक्षण घेत आहे.प्रणाली हे श्रेय आई वडीला सह आजी आजोबांना व कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक यांना देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर