ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिवरीच्या लेकीची कर्तृत्वगाथा!

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सलून चालकाच्या मुलीची यवतमाळ पोलीस दल मध्ये दमदार एन्ट्री

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील हिवरी या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली असून, अत्यंत साध्या व गरीब कुटुंबातील कु. समीक्षा विलास हनुमंते हिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यवतमाळ येथील पोलीस दलात ‘ओपन’ प्रवर्गातून स्थान मिळवत गावासह तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

काल उशिरा जाहीर झालेल्या निवड यादीत समीक्षाचे नाव झळकताच गावात आनंदाची लाट उसळली. सलून व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांची मुलगी पोलीस खात्यात दाखल होत असल्याने गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला.


समीक्षाने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, हिवरी येथे पूर्ण केले.
त्यानंतर नवरगाव येथील पंचशील विद्यालयातून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाली. शिक्षणाची वाट कायम ठेवत तिने वणी येथील लोकमान्य टिळक कॉलेज (ओपन युनिव्हर्सिटी) मधून पदवी प्राप्त केली.


वणी येथे वास्तव्यास राहून तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही मोठे स्वप्न आणि त्यासाठीची अथक मेहनत यामुळेच तिने हे यश संपादन केले आहे.अनेक अडचणींवर मात करत अखेर तिच्या कष्टांना यश मिळाले आणि काल जाहीर झालेल्या यादीत तिची पोलीस दलात निवड झाली. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर कोणतीही अडचण मात करता येते,” हे समीक्षाने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. हिवरीच्या या लेकीने केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचा सन्मान उंचावला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर