ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिवरा (मजरा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (28 नोव्हेंबर 2025) पहाटे समोर आली. धनराज वासुदेव काळे (वय 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास धनराज काळे यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांना वणी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी गंभीर प्रकृती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील दवाखान्यात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काळे यांच्याकडे अंदाजे तीन एकर शेती असून त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याने नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पुढील तपास मारेगाव पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे हिवरा (मजरा) गावात शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर