ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

शेतकरी पुत्राची आत्महत्या.

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

समाजमन सुन्न, सतत राहायचा चिंतेत.

सुरेश पाचभाई मारेगाव,

पुणे येथे एका कंपनीमध्ये काम करणारा आणि गावामध्ये आईवडिलांच्या भेटीला आलेल्या एका शेतकरीपुत्राने विषारी औषधी घेऊन जीवन संपविले. समाजमन सुन्न करणारी ही घटना मारेगाव तालुक्यातील मुकटा येथे घडली.

असून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव प्रफुल उत्तम तुराणकर, 29 असे आहे.प्रफुल हा अविवाहित आहे. घरची हलाखीची परिस्थिती आणि तीन भावांमध्ये फक्त 4 एकर शेती असल्याने इतर कामासाठी तो पुणे येथे गेला.तेथे बजाज कंपनीमध्ये काम करीत होता.घरच्यांच्या भेटीसाठी तो नुकताच गावाला मुकटा येथे आलेला होता.काही दिवसांपासून तो विमनस्क स्थितीमध्ये होता असे घरच्यांनी सांगितले.

घरची बेताची परिस्थिती आणि होत नसलेले उत्पन्न यामुळे वडील नेहमी चिंतेत दिसायचे.याचे त्याला दुःख व्हायचे.तो काल दि. 27 मे ला पुणे येथे जाणार होता.त्यामुळे त्याचे आई त्यांचेसाठी जेवणाचा डब्बा बनवून द्यायच्या कामी होती. वडील जनावरांना चारापाणी करायला शेतात गेलेले होते. ही संधी साधत प्रफुलने घरी असलेली विषारी औषधी घेतली.त्याला उलटी झाल्यामुळे ही गोष्ट आईच्या लक्षात आली.त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून प्रफुलला चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात भरती केले.

ही घटना काल सायंकाळी 4.45 च्या दरम्यान घडली.चंद्रपूर येथे उपचारादरम्यान आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान प्रफुलची प्राणज्योत मालवली.पुणे येथे काम करणारा आणि तीन भावांमध्ये धाकटा असलेला प्रफुलच्या अचानक जाण्याने समाजमन सुन्न झाले आहे. प्रफुलच्या मागे आई वडील,दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर