ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

डोंगरगांव शेतशिवारात वाघाने पाडला कालवडीचा फडशा.

102 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पशुधन पालकाची नुकसान भरपाईची मागणी

तालुका प्रतिनिधी:- वणी

वणी तालुक्यातील डोंगरगांव (बोलघाट) येथील शेतशिवारातील ही घटना आज दिनांक 12 सप्टेंबर 2022 सोमवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग सुरू होताच पुन्हा परिसरात वाघाने एंट्री केल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या डोंगरगांव , वेगाव,परिसरातील शेतशिवारात कपाशीचे निंदण व खुरणीचे कामे जोमाने सुरू आहे त्यातच डोंगरगांव येथील शेतकरी अमर विश्वनाथ चोपणे यांच्या मालकीची कालवड ही डोंगरगांव येथील त्यांचे जंगला जवळील पडीक शेतशिवारात नेहमी प्रमाणे त्यांचा मुलगा बापू चोपणे हा पशुधन घेवुन चराईसाठी गेला होता.

अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने कालवडीवर हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना दिनांक 12 सप्टेंबर 2022 सोमवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास शेतकरी स्वतःच्या शेतात जनावरे चारत असताना वाघाने हल्ला केला व गाईला ओढत नेत ठार केल्याचे निदर्शनास येताच घटना उघडकीस आली. पशुधन मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली.

बातमी लिहीपर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते शेतकरी पशुधन मालक अमर विश्वनाथ चोपणे यांच्या मालकीची कालवड असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.कालवडीचा वाघाने पडशा पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी.

शेतकरी व पशुपालक अमर विश्वनाथ चोपणे यांनी केली आहे. परिसरात शेतीचे काम जोमाने सुरू आहे त्या मुळे वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर