ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

**मारेगाव नगरपंचायतमध्ये रंगलाय राज रंग *
भाजपाच्या चारही सभासदांना मिळाले सभापतीपद
शिवसेनेला सारण्यात आले बाजूला

59 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुका प्रतिनीधी:- सुरेश पाचभाई (9922862184)

सविस्तर वृत्त असे की….
मारेगाव नगरपंचायतमध्ये अजूनही धक्यावर धक्के सुरू आहे. दि. 21 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या स्वीकृत सभासदानंतर सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडलेली दिसून येत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जे एकमेकांच्या सोबत होते तेच विरोधात गेल्याने सभापती निवडीवेळी मोठी उलटफेर पाहायला मिळाली.
मारेगाव नगरपंचायतची सभापती निवडीसाठी दि. 21 फेब्रुवारीला विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी सभापतींच्या
निवडणुकीमध्ये मोठी उलटफेर होईल अशी शक्यता आधीच वर्तविण्यात येत होती आणि ती तंतोतंत खरी ठरली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस पक्षाला शह देत भाजपच्या मदतीने अध्यक्षपद बळकावले. आणि उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपाचा गेम करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पुरेपूर परतफेड आज भाजपने केलेली दिसून येत आहे. शिवसेना आणि भाजपाची काही काळापुरती बनलेली युती मात्र सभापती निवडीवेळी दिसून आली नाही. तर वेगळेच समीकरण येथे अस्तित्वात आले आहे ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. कारण सभापती निवडणूक ही बिनविरोध झाली असून चारही सभापती भाजपाचेच बनलेले आहे. यातही महत्वाचे म्हणजे या सभासदांच्या नावाला काँग्रेसच्या सभासदांनी सूचक आणि अनुमोदन दिलेले आहेत. एकीकडे राज्यात एकमेकांच्या विरोधात असलेले भाजप आणि काँग्रेस मारेगाव शहरात मात्र शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी नकळत एकत्र आलेले दिसत आहे.
शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी ठरली यशस्वी
मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी भाजपने शिवसेनेला सहकार्य केल्यानंतर शिवसेनेने भाजपला सहकार्य करणे अपेक्षित असतांना मात्र शिवसेनेने वेगळी वाट चालत भाजपला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तो ईश्वरचिठ्ठीवर गेल्याने अयशस्वी ठरला. आणि भाजपचा उपाध्यक्ष बनला. ही सर्व सल मनामध्ये होतीच. आणि याचाच बदला सभापती निवडीच्या वेळी दिसून आला. आणि कधी एकत्र न येणाऱ्या भाजपाला काँग्रेसनेही सहकार्य करत शिवसेनेला सभापती पदापासून दूर ठेवले.
यामध्ये बांधकाम सभापती म्हणून राहुल राठोड, महिला व बालकल्याण सभापती म्हणून हर्षा अनुप महाकुलकर, वैभव पवार – पाणीपुरवठा सभापती, सुशीला डोमाजी भादीकर- स्वच्छता व आरोग्य सभापती यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. या सर्वांच्या निवडीची चर्चा मात्र सगळीकडे सुरू झालेली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर