ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

संभाजीनगरमध्ये गुजरातच्या तरुणाचा मातीखाली दबून मृत्यू:‘आई, पैसे पाठवतो,’ सकाळी सांगितले अन् सायंकाळी गाडला गेला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा भागात सुरू असलेल्या महापालिकेच्या ड्रेनेजलाइनच्या कामाने मंगळवारी संध्याकाळी एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. पोटासाठी घरापासून दूर आलेल्या १९ वर्षांच्या महेशभाई रूपसिंग डांगोर (रा. गुजरात) या तरुण मजुराचा अंगावर मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाला. कासंबरी दर्गा भागात ड्रेनेजसाठी जेसीबीच्या साहाय्याने सुमारे ५ फूट खोल चारी खोदण्याचे काम सुरू होते. त्या चारीत महेश काम करत होता. चारीतून उपसलेली माती व दगडांचा ढिगारा लगतच होता. हा ढिगारा अचानक कोसळला आणि काही क्षणांत महेश मातीखाली गाडला गेला. या घटनेनंतर सहकाऱ्यांनी जिवाच्या आकांताने माती बाजूला करत महेशला बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात केली आहे. चारीलगत टाकलेली माती अचानक ढासळली
मंगळवारी सकाळीच महेशने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता. ‘आई, लवकरच घरी पैसे पाठवतो,’ असे तो आईला म्हणाला होता. त्याच्या घरी गुजरातमध्ये आई, वडील व एक भाऊ आहे. कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे स्वप्न घेऊन तो शहरात कामाला आला होता. चारी खोदून उपसलेली माती, दगड चारीलगत न टाकता काही अंतरावर टाकले असते तर दुर्घटना टळली असती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर