ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बहिण पीएसआय, तर भावाची पोलिस दलात निवड:सावर्डीच्या खोब्रागडे कुटुंबातील बहीण भावाची यशोगाथा, गावाचे नाव अभिमानाने उंचावले‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती तालुक्यातील सावर्डी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भावंडांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यशाची नवी गाथा लिहिली आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रतिक्षा रुपचंद खोब्रागडे यांनी महाराष्ट्र पोलिस अकादमीचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. तर त्यांचे बंधू सुमित रुपचंद खोब्रागडे यांचीही वरणगाव पोलिस दलात निवड झाली आहे. ग्रामीण भागात मर्यादित सुविधा असतानाही प्रतिक्षा यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रमाच्या बळावर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पद मिळवून आपल्या कुटुंबासह सावर्डी गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. प्रतिक्षा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत. त्यांच्या यशातून मोठी स्वप्ने पाहून मेहनत केल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येते, हा संदेश त्यांच्या यशाने दिला आहे. दुसरीकडे, त्यांचे बंधू सुमित खोब्रागडे यांनीही पोलिस सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले असून त्यांची वरणगाव पोलिस दलात निवड झाली आहे. एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी पोलिस सेवेत स्थान मिळवल्याने खोब्रागडे कुटुंबावर आणि संपूर्ण सावर्डी गावावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण करून गावात परतलेल्या प्रतिक्षा खोब्रागडे यांचे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ध्येय उराशी बाळगणे आयुष्यात आहे महत्वाचे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते. ध्येय उराशी बाळगून त्यानुसार तयारी, परिश्रम केले तर एक दिवस निश्चितच यश मिळते. ग्रामीण भागातील शाळेत जरी शिक्षण झाले असले तरी काहीच बिघडत नाही. प्रत्येकाने स्वत:शी इमानदार राहत काम केले तर त्याला स्वप्नपूर्ती करता येते. मार्गात कितीही अडथळे आले तरी न डगमगता वाटचाल सुरू ठेवली तर अपेक्षित साध्य करता येते, हेच प्रतिक्षा व सुमित यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर