ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनिधी कळंब नितेश क्षीरसागर

कळंब, दि. ३० जानेवारी २०२६ स्थानिक शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा, कळंब यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाली.

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबरच बाह्य जगाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, पर्यटनातून ज्ञानवर्धन व्हावे आणि क्षेत्रभेटीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या सहलीत विद्यार्थ्यांना कोराडी आणि द्वारका वॉटर पार्क या पर्यटनस्थळांना भेट देण्यात आली. जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी या सहलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कोराडी येथील परिसरदर्शनातून विद्यार्थ्यांना पर्यावरण, ऊर्जा निर्मिती व स्थानिक भूगोल यांची माहिती मिळाली, तर द्वारका वॉटर पार्क येथे विविध जलखेळांचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. शिक्षण व मनोरंजन यांचा समतोल साधणारा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी स्मरणीय ठरला.

संपूर्ण सहल सुरक्षित, आनंददायी व शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हावी यासाठी संस्थेचे व्यवस्थापक प्रा. बाळासाहेब धांदे यांनी मार्गदर्शन केले. सहलीच्या यशस्वी आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक आशिष महाजन यांच्यासह प्रवीण देशमुख, कु. शालू सदाफळे, कु. चंद्रभागा मेश्राम, मनोज शिवरकर, शिवम चांदोरे, मयूर होले, सौ. प्रांजली दरणे, देवानंद चांदोरे आदी शिक्षक व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पालकांच्या सहकार्याबद्दलही शाळा व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले.या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्तीला चालना मिळाली असून, मैदानी अनुभवातून सामाजिक जाणीव व सहप्रवासाची शिस्त विकसित झाल्याचे मत शिक्षकवर्गाने व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर