ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

वडिलांनी 2 मुलींना रात्रभर उलटे टांगले:केवळ चोरीच्या संशयावरून सैतानी कृत्य; एका चिमुकलीने पाणी – पाणी म्हणत सोडला जिव

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केवळ चोरीच्या संशयावरून आई-वडिलांनी आपल्या पोटच्या 2 मुलींना रात्रभर उलटे टांगून ठेवल्याची हृदयद्रावक, पण तेवढीच संतापजनक घटना सांगलीच्या आटपाडी तालुक्यात घडली आहे. या घटनेत एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरीची प्रकृती चिंताजनक आहे. या चिमुकल्या रात्रभर पाणी – पाणी म्हणून तडफडत होत्या. पण त्यांच्या आई – वडिलांना त्यांची थोडीही दया आली नाही. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात ही घटना घडली आहे. नाना हैबत यमगर असे आरोपी वडिलांचे, तर सानिका असे मृत मुलीचे नाव आहे. शेजाऱ्याच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून सानिकाच्या आई-वडिलांनी सानिका व तिची बहीण अनुजा या दोघींना बुधवारी रात्री 8 च्या सुमारास घरात उलटे टांगले होते. या निष्पाप मुली रात्रभर त्याच स्थितीत वेदनेने तडफडत होत्या. त्यांचा घसा कोरडा पडल्यानंतर त्यांनी आई-वडिलांकडे पाण्याची मागणी केली. त्या पाणी-पाणी म्हणून अक्षरशः ओरडत होत्या. पण जन्मदात्या आई-वडिलांच्या हृदयाला थोडाही पाझर फुटला नाही. मुलींच्या आजोबांवरही हल्ल्याचा प्रयत्न आरोपी पालक तसेच रात्रभर झोपी गेले. मुलींचे आजी-आजोबा घराबाहेर झोपले होते. रात्रभर झालेल्या वेदनांमुळे इवलुश्या सानिकाने जीव सोडला. त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास तिच्या आजोबांनी या दोघींना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावरच कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मुलीजवळ जाऊन पाहिले असता त्यांना सानिका व अनुजा या दोघीही निपचित पडल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी त्यांना खाली उतरवून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे सानिकाला मृत घोषित करण्यात आले. असा झाला प्रकरणाचा भांडाफोड सानिकाचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी नाना हैबत यमगर यमगर यांनी तिचा मृतदेह घरी आणला. त्यानंतर आपले भयंकर कृत्य लपवण्यासाठी आई-वडिल व काही नातेवाईकांनी मिळून सानिकाच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकरणाचा भांडाफोड गंभीर जखमी झालेल्या अनुजामुळे झाला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अनुजा शुद्धीवर आली. तिने डॉक्टरांना आपल्या बापाने दिलेल्या अमानुष वागणुकीचा व सानिकाच्या मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हे ऐकून डॉक्टरही सुन्न झाले. त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या सैतानी कृत्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर