ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आसान्या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आणि शेतकऱ्यांना फवारणी किटचे वाटप

140 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ आसान्या फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय अमोल रंगारी मुख्य व्यवस्थापक जिल्हा पोस्ट कार्यालय यवतमाळ यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जयाताई महाकाळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी कृषी विभाग जिल्हा परिषद यवतमाळ तसेच माननीय डॉक्टर स्नेहल दिघाडे माननीय सुनीलभाऊ मालके शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ ,मा. हिरालाल फुलझेले साहेब, मा. डॉ. किशोर बनसोड पशुवैद्यकीय अधिकारी दारव्हा यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर धम्मचारी हर्ष प्रिय यांच्या वतीने सामूहिक प्रार्थना घेण्यात आली तसेच मान्यवरांचे रोप कुंडी देऊन स्वागत करण्यात आले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये वंदनाताई उरकुडे बाल संस्कार वर्ग नियमितपणे चालविणे तसेच सामाजिक कार्यासाठी त्यांचा सन्मान आणि पल्लवीताई कांबळे यांचा महिला सशक्ती करणाच्या अनुषंगाने सन्मानशेला आणि पुस्तक भेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

सत्कारमूर्तींनी आपल्या कार्याची माहिती आणि अनुभव सांगितले त्यानंतर जया महाकाळे मॅडम यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फवारणी किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अमोल रंगारी यांनी पोस्ट खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या लोकाभिमुख योजनेची माहिती आपल्या भाषणातून सांगितली त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये आसान्या फाउंडेशनच्या वतीने पिंपळ ,कडुलिंब,आवळा,उंबर,जांभूळ, सिताफळ,चिंच या झाडांचे रोपण करण्यात आले.

आणि वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला याप्रसंगी राजेश रंगारी जात पडताळणी कार्यालय अमरावती ,सुनील वानखेडे ,पुरुषोत्तम भजकवरे ,वानखेडे भाऊ, निलेश सुखदेवे नितीन मेश्राम ,मीनाताई रामटेके, वंदनाताई मेश्राम,पुष्पाताई शेळके आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करण्यासाठी आसान्या फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या मृणालिनी दहीकर आणि नितीन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर