ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जुन्या पेन्शन मागणीसाठी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी झाले आक्रमक.

128 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ जिल्हा जुनी पेन्शन समन्वय समितीच्या आयोजनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन.

जिल्हयातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला एल्गार.

आगामी नागपूर अधिवेशनात करणार शक्ती प्रदर्शन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

यवतमाळ – १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा/तुकड्यांवर नियुक्त परंतु तद्नंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना हक्काची जुनी पेन्शन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचारी जुनी पेन्शन समन्वय समिती च्या वतीने शनिवार दि. १० डिसेंबर रोजी दु. १२ ते ५ या वेळेत यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन शासनाला जिल्हाधिका-यांमार्फत निवेदन दिल्या गेले.

सदर कर्मचारी मागील ११ वर्षांपासून जुन्या पेन्शनसाठी विविध मार्गांनी शासनाशी संघर्ष करत आहेत. या धरणे आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पेन्शन पिडीत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ‘जुनी पेन्शन’चा नारा बुलंद केला.

या धरणे आंदोलनात सहभागी पेन्शन पिडितांनी पेन्शन लढ्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.यानंतर कोणत्याही संघटनेच्या किंवा राजकीय नेतृत्वाशिवाय केवळ पेन्शन पिडीतांच्या स्वनेतृत्वामध्येच व ‘राज्य समन्वय समिती’ च्या एकमेव झेंड्याखाली पेन्शनसाठी शासनाशी दोन हात करण्याचा दृढ संकल्प केल्या गेला.

सदर आंदोलनामुळे जिल्हातील पेन्शन पिडीत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यानंतर राज्य समन्वय समिती च्या नियोजनानुसार यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक पेन्शन पिडीत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आगामी लढ्यासाठी सज्ज असेल, असा निर्धार यावेळी व्यक्त केल्या गेला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर