ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

करंजी येथे लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाची पायाभरणी, करंजी रोड पत्रकार संघटना उद्घाटन सोहळा संपन्न.

130 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

संघटनेच्या अध्यक्षपदी, विलास होलगीलवार तर सचिव पदी, राजीव आगरकर यांची निवड.

केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे
[ 9822147144 ]

करंजी रोड: लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजेच पत्रकारिता होय. लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते म्हणूनच ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या प्रशासनाच्या पटलावर मांडण्याचा मुख्य हेतूने प्रेरीत होत, “करंजी रोड पत्रकार संघटनेचा”उदघाटन सोहळा दिनांक 19 ऑक्टोबर 2022 ला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

करंजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील (नागपूर पॉईंट ) येथे “करंजी रोड पत्रकार संघटनेचा ” उद्घाटन व फलक अनावरण बुधवार दिनांक 19 ऑक्टोबरला दुपारी 12:30 वाजता पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीशजी मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे, बीट जमादार प्रमोद जुनूनकर ,शशिकांत चांदेकर, उमेश कुमरे, करंजी पोलीस पाटील वंदनाताई खैरे ,स्वावलंबी महिला बचत गटाच्या सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील सर्व पोलीस पाटील बांधव ,करंजी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी करंजी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच करंजी रोड पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला.

उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी सर्वप्रथम, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.जगदीशजी मंडलवार यांचे करंजी रोड पत्रकार संघटनेमार्फत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर उद्घाटक यांनी करंजी रोड पत्रकार संघटनेच्या फलकाचे पूजन व अनावरण केले. याप्रसंगी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना त्यांनी,” पत्रकार हा सर्वसमावेशक, निर्भीड ,सर्वधर्मीय व सत्याची बाजू घेऊन लेखणीत मांडणारा असावा असे मनोगत व्यक्त केले’.

तसेच “करंजी रोड पत्रकार संघटनेला” उज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या. तत्पूर्वी दिनांक 14 ऑक्टोबर 2022 ला करंजी रोड पत्रकार संघटना,कार्यकारणी गठीत करून सर्वानुमते ‘करंजी रोड पत्रकार संघटनेचे’ अध्यक्षपदी विलास होलगिलवार तर उपाध्यक्षपदी अमोल कांबळे आणि संघटनेच्या सचिव पदी राजीव आगरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सदस्य गणामध्ये सुनील वनकर ,सागर मुडे व धनराज दहिगुडे यांची नियुक्ती करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर