ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कोडपाखिंडी शिवारातील कोंबड बाजारावर पाटण पोलीसांची कारवाही

93 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एकुण १,३०,२७०-/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी दि.३१/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन पाटण येथे हद्दीत ग्राम कोडपाखींडी शिवारात व पोलीस स्टेशन पाटण व मारेगाव यांच्या हद्दीलगतच्या ग्राम पाचपोहर शिवारातील घनदाट जंगलाच्या परीसरात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळ ( कोंबडबाजार) सुरू असल्याची माहिती पाटण पोलीस स्टेशनला मिळाल्यावरुन ठाणेदार संदीप पाटील व पोलीस स्टाफ यांनी दोन पथके तयार करून हद्दीत कारवाई करीता रवाना झाले.

एक पोलीस पथक पाचपोहर जंगल परीसरात गेले असता ,काही इसम हे कोंबड्यांच्या पायाला लोखंडी काती बांधून कोंबड्यांचा आपआपसात झुंजी लावुन त्यावर पैशांचा जुगार लावत खेळ खेळवितांना दिसुन आल्याने पोलीसांनी त्या ठिकाणी छापा कार्यवाही करुन ०५ संशयित आरोपींना मोक्यावर ताब्यात घेतले त्यात नामे १) बाबाराव भिमराव गेडाम रा.भुताईपुर २) मारोती भिमराव आत्राम रा.आंबेझरी ३) भिमराव लिंगा मडावी रा.शिबला ४) सिंगटराव सोमजी मरस्कोल्हे रा.शिबला ५) रामजी लखमा टेकाम रा. पाचपोहर असे मिळुन आले व ईतर लोक हे पोलीस आल्याची चाहुल लागताच जंगलाचा फायदा घेवुन पळुन गेले.पोलीसांनी मिळुन आलेल्या लोकांची झडती घेवून त्यांच्याकडून रोख रक्कम, तीन जिवंत कोंबडे, लोखंडी काती व दोन मोटारसायकली असा एकुण १,२४,५८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

त्याचप्रमाणे दुसऱ्या पोलीस पथकाने कोडपाखींडी शिवारात चालु असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवर कारवाई करण्यासाठी जावुन तीन संशयित आरोपी नामे १) प्रदीप दिलीप तलांडे रा.झरी २) प्रविण बापुराव टेकाम रा.मांडवा ३) रूपेश देवराव मेश्राम रा.बोटोनी यांना पकडले व त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम,दोन जिवंत कोंबडे व लोखंडी काती असा एकुण ५६९०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या दोन्ही रेड मधील एकुण 08 आरोपी , 05 कोंबडे, काती व 02 मोटारसायकली असा एकुण १,३०,२७०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींसह पाटण पोलीस ठाण्यात आणुन आरोपींविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


सदरची कारवाई पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ.श्री.पवन बन्सोड साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक,यवतमाळ श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री गणेश किंद्रे साहेब यांच्या .मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पाटणचे ठाणेदार सपोनि संदिप पाटील,पोलीस अंमलदार रतीष वानखेडे,अमित पोयाम,प्रशांत तलांडे,संदिप नामेकर,राहुल बोंडे, संदिप सोयाम,नरेश गोडे,सुरेश राठोड, उमेश डोंगरे यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर