ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पाटण येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे विध्यार्थी पोषण आहारापासून वंचित.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पालकांनी स्वखर्चाने शिजवून खावू घातला पोषण आहार.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामनी तालुक्यातील दोन अडीच वर्षे कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले.यावर्षी निर्विघ्न शाळा सुरू करणात आल्या आहेत परतु झरी  तालुक्यात शाळा केवळ नाममात्र सुरु असल्याची अवस्था पाहायला मिळत आहे.पाटण येथे उच्च प्राथमिक शाळा असून विध्यार्थी संख्या ही 260 असून येथे एक ते सात वर्ग चालतात मात्र मुख्याध्यापक दोन दिवसापासून सुट्टी वर आहे.

शाळेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे .पोषण आहार मिळणे विधार्थ्यांचा हक्क आहे.तो मिळतं नसल्याचे व अपुऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा संताप पालकात दिसून येत आहे .शालेय पोषण आहारासाठी निधी येतो .त्यातून विध्यार्थ्यांचा शारीरिक व बौध्दिक विकास व्हावा मुलांना शाळेत आल्यावर जेवण्यास साठी घरी जाण्याची वेळ येऊ नये अशी अनेक कारणे आहेत.

मात्र हे पोषण आहार मिळतं नसल्याने विध्यार्थी घरी जात आहे .पाटण हे रहदारीचे गाव आहे या दरम्यान काही अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल पालक विचारत आहे .मुख्याध्यापका सह काही शिक्षक ही सुट्टी वर असल्याचे आढळून आले .या शाळेत 260 विध्यार्थी व एकूण आठ शिक्षक असून मुख्याध्यापकासह काही शिक्षक ही सुट्टीवर असल्याने मुलांचे नुकसान होत असल्याचे दिसते.

मुख्याध्यापक अनेकदा सुट्टीवर असल्याचे पालक वर्ग सांगत आहे .या पोषण आहाराचा प्रभार दुसऱ्या कुणाकडेही नसल्याने.तीन दिवसापासून आहार मिळणे कठीण झाले आहे.आज मुलांना पोषण आहार मिळावा म्हनुन पालक वर्गाने स्वतः पैसे खर्च करून मुलांना पोषण आहार खाऊ घातला . दुपारी अडीच वाजता आहार शिजविन्या ची प्रक्रिया सुरू झाली तर ते 4 वाजता मुलांना खायला मिळाले .शासनाकडून पोषण आहारा साठी इतका निधी येऊन मग पोषण आहार का नाही ?असा सवाल पालक वर्ग विचारत आहे .

दरवर्षी पेक्षा या वर्षी विद्यार्थी संख्या घटलेली दिसते विद्यार्थी व पालकात या शाळेकडून सकारात्मक प्रतिसाद जर मिळत नसेल तर पालक वर्ग सामूहिक रित्या विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याच्या मनस्थितीत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद चुक्कलवार व कपिल अंगलवार व पाटणचे पालक वर्ग मोठ्या प्रमाणात शाळेत हजर होते .


” विध्यार्थ्यांना पोषण आहार नियमित मिळत नाही . मुख्याध्यापकाचे सहकार्य मिळत नाही .पालक या बाबतीत मला वारंवार भेटतात . पालक वर्गात संताप आहे . ”

    अरविंद चुक्कलवार
शालेय व्यवस्थापण समिती सभापती
जि .प .उच्च प्रथिमिक शाळा पाटण
पं.स.. झरी जामनी जी. यवतमाळ

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर