ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

महा विस्तार AI अ‍ॅप’ नोंदणीसाठी मारेगाव कृषी विभागाचे आवाहन

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या *‘महा विस्तार AI अ‍ॅप’*ची नोंदणी मोहीम सध्या राज्यभर राबविण्यात येत असून, मारेगाव तालुक्यातील कृषी विभागाने नागरिकांना या अ‍ॅपवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी, रोजगार, प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एकाच अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ‘न्यूज लावा दादा’ या उपक्रमांतर्गत महा विस्तार AI अ‍ॅपची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून नोंदणी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, बाजारभाव, कृषी सल्ला तसेच शासनाच्या विविध योजनांची अद्ययावत माहिती सहजपणे मिळणार आहे. त्यामुळे विशेषतः शेतकरी बांधवांनी या अ‍ॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी पुढाकार घ्यावा, असेही आयोजकांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महा विस्तार AI अ‍ॅप महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये महा विस्तार AI अ‍ॅप डाउनलोड करून नोंदणी करावी तसेच इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर