ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

भिवंडीत शोरमा-पिझ्झातून फूड पॉयझनिंग:लहान मुलांसह 37 जणांची प्रकृती बिघडली, फूड आउटलेट मालकावर गुन्हा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बाहेरचे फास्ट फूड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये घडली आहे. येथील एका नामांकित फूड आउटलेटमधून शोरमा आणि पिझ्झा खाणे अनेक कुटुंबांना चांगलेच महागात पडले. पिझ्झा खाल्ल्यानंतर काही तासांतच लहान मुलांसह तब्बल 37 जणांना फूड पॉयझनिंग झाली असून, त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्याच दिवशी सुरू झाला त्रासाचा फेरा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व नागरिकांनी बुधवारी रात्री आउटलेटमधून पिझ्झा विकत घेऊन खाल्ला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारपासूनच त्यांना पोटदुखी, उलट्या, चक्कर आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. गुरुवारी सायंकाळपासून रुग्णांना रुग्णालयात आणण्याचा सुरू झालेला हा सिलसिला थेट शुक्रवार सकाळपर्यंत सुरूच होता. सुदैवाने, सर्व रुग्णांवर वेळेत उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पिझ्झाचे नमुने जप्त; पोलिसांची कारवाई
या खळबळजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित फूड आउटलेटच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अन्नबाधा नेमकी कशामुळे झाली, हे शोधण्यासाठी आरोग्य विभागाने पिझ्झाचे नमुने जप्त करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हे ही वाचा.. आमदार निवासात पाण्याची टंचाई: कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर