ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नराधमाला तीन दिवसाची पोलीस कोठडी पहापळ बाल लैंगिक अत्याचार प्रकरण.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नराधमास फाशीची मागणी.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील एका नराधमाने 6 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला काटेरी फासात टाकुन दिले.व वरून पुन्हा काट्या टाकुन त्यावर दगड ठेवले व नराधम फरार झाला होता,काही वेळातच मारेगाव पोलिसांनी मोठया शिताफीने वडकी येथुन अटक केली होती.त्याला आज दिनांक 12 मे 2022 रोज गुरुवारला त्याला पांढरकवडा कोर्टाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मारोती मधुकर भेंडाळे वय 33 वर्षे रा. पहापळ असे नाबालिक पीडितेवर अत्याचार करणाऱ्या हैवान नराधमाचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील हि घटना दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली होती. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार पीडित मुलगी आजी सोबत शौचास गावाबाहेर गेली होती दरम्यान मारोतीने तिला शेतशिवारात उचलून नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.व आरोपीने गावातून पोबारा केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलिस ठाण्यात मारोती विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ व वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगावचे पोलिस निरिक्षक राजेश पुरी, सहाय्यक पोलिस निरिक्षक सांवत, वणीच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक माया चाटे, पोलिस जमादार चंद्रकांत पाटील, राजु टेकाम, अजय वाभिटकर यांनी या घटनेचा तपास केला. आरोपीला वडकीयेथुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेत अटक केली.

संशियत आरोपी मारोती याला आज गुरूवार दिनांक 12 मे 2022 ला पांढरकवडा कोर्टात हजर केले असता त्याला तिन (15 मे )दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीवर यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेने मारेगाव तालुका हादरला असून हैवान नराधमाला फाशी च्या शिक्षेची मागणी विविध स्तरावरून होत आहे.


  

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर