ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके:मनपा, जि.प., अनुदानित शाळांतील 1 ली ते 8 च्या विद्यार्थ्यांचा समावेश‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवे शैक्षणिक सत्र लवकरच सुरू होणार असून, जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, अनुदानीत अशा २४१७ शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ७९ ३८१ विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. सध्या ११ लाख २२, ७३२ पुस्तके पुस्तके पोहोचली असून, काही उर्वरित पुस्तके शाळा सुरू होण्याच्या आधी पोहोचतील, अशी माहिती शिक्षण विभागाद्वारे देण्यात आली आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ५ लाख १८ हजार ८४९ तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ६ लाख ३ हजार ८८३ पुस्तकांचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले. राज्य शासनाच्या योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तके वितरित केली जातात. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदवली आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ सुरू होण्यास केवळ एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने उर्वरित पुस्तकेही लवकरच जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडे पोहोचणार आहेत. शाळांनी पुस्तक वितरणाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांद्वा रे देण्यात आले आहे. …आतापर्यंत ७५ टक्के पुस्तके दाखल झाली जिल्ह्यात मागणीनुसार आतापर्यंत ७५ टक्के पुस्तके पोहोचली असून उर्वरित पुस्तके येत्या काही दिवसांत मिळतील. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके मिळणार आहे. कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी पात्र शाळांकडून इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची संख्या मागवण्यात आली आहे. त्यानुसार शाळांना पुस्तके मिळणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर