ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

ईव्हीएमची ‘अग्निपरीक्षा’:इतिहासात पहिल्यांदाच 17 तारखेला मतदान यंत्राची होणार ‘डायग्नोस्टिक टेस्ट’; नेमके काय होणार? वाचा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची १६ आणि १७ एप्रिल रोजी ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी ठरणार आहे. बीईएलचे इंजिनिअर्स करणार तपासणी सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’चे (बीईएल) तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करतील. या प्रक्रियेत यंत्राच्या ‘बर्न मेमरी’मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाईल. निकालावर टांगती तलवार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीतून शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी नसीम खान (काँग्रेस) यांचा अत्यंत निसटत्या फरकाने पराभव केला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी या तक्रारीची दखल घेत तपासणीचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्याच्या निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. काय आहे ‘डायग्नोस्टिक टेस्ट’? “हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. १६ आणि १७ एप्रिलला होणाऱ्या या तपासणीतून सत्य जनतेसमोर येईल, ” असे मत या प्रकरणी याचिकाकर्ते नसीम खान यांनी व्यक्त केले. २०,६२५ मतांच्या फरकाने नसीम खान पराभूत चांदिवली विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत अवघ्या ४०९ मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवणाऱ्या लांडेंनी २०२४ मध्ये मात्र ही आघाडी तब्बल २०,६२५ मतांपर्यंत खेचून नेली. चांदिवलीत एकूण ५३% मतदान झाले. यात दिलीप लांडे यांनी १,२४,६४१ मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला, तर नसीम खान यांना १,०४,०१६ मतांवर समाधान मानावे लागले. २०१९ च्या ‘काट्याच्या’ लढतीनंतर नसीम खान यावेळी मुसंडी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र लांडेंनी मोठ्या फरकाने खान यांना अस्मान दाखवत राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालातील मतमोजणीच्या तफावतीवरून आता ईव्हीएमच्या ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ची चर्चा रंगली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर