ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

तंजावरच्या मराठी काव्य परंपरेचा ठेवा उलगडणार!:ज्येष्ठ संशोधक डॉ. सतीश बडवे यांना रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप जाहीर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाङ्गमय विभागाचे माजी प्रमुख, संशोधक, समीक्षक डॉ. सतीश बडवे यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडूमधील ‘तंजावर येथील मराठी कवींची वाङ्गमयीन कामगिरी व योगदानाचे स्वरूप’ हा त्यांच्या बृहत संशोधन प्रकल्पाचा विषय आहे. तामिळनाडू प्रांतातील तंजावर येथील राजे शरफोजी भोसले सरस्वती महालातील हस्तलिखितांच्या आधारे हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. मराठी काव्य परंपरेतील हा महत्त्वाचा ठेवा असून त्याचा परिचय करून देणारा हा महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प आहे. त्यासाठी डॉ. बडवे यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची रवींद्रनाथ टागोर नॅशनल फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. तामिळनाडूस्थित तंजावर येथे जाऊन डॉ. सतीश बडवे हे या संशोधनाचे काम पूर्ण करणार आहेत. डॉ. सतीश बडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख राहिलेले आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यामध्ये ‘मध्ययुगीन मराठी वाङ्गमय : चिंतन आणि चर्चा’, ‘भक्तीपरंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंध’, ‘आकलन आणि अन्वयार्थ’, ‘मध्ययुगीन साहित्याविषयी’, ‘संत साहित्य समीक्षेचे बीजप्रवाह’, ‘साहित्याची सामाजिकता’ या प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. त्यांनी नऊ ग्रंथांचे साक्षेपी संपादन केलेले आहे. विविध वाङ्गमय नियतकालिकांच्यामधून त्यांचे सातत्याने लेखन प्रसिद्ध होत असते. डॉ. बडवे यांनी गो. पु. देशपांडे यांच्या इंग्रजी लेखांचे, प्रा. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘इग्नो’ मधील इंग्रजी भाषणांचे, पी. नरसिंहाचारी यांच्या ‘रामानुज’ या इंग्रजी ‘मोनोग्राफ’ चे मराठी भाषांतर, अनुवाद केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थ्यांनी एम. फिल्. पदवी पूर्ण केली आहे. तर 15 विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवीचे संशोधन पूर्ण केले आहे. ‘भक्ती परंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंधाचा शोध’ या प्रकल्पासाठी त्यांना यु. जी. सी. कडून संशोधन शिष्यवृत्ती जाहीर झालेली होती. ‘मराठवाड्याच्या सीमावर्ती प्रदेशातील भाषिक व सांस्कृतिक आदान- प्रदान’ या संशोधन प्रकल्पासाठी त्यांना 2014 मध्ये आय. सी. एस. एस. आर. मधून शिष्यवृत्ती मिळाली होती. ‘मध्ययुगीन कालखंडातील विविध धर्मसंपदाच्या पदरचना : एक शोध’ हा प्रकल्प त्यांनी 2020 ला पूर्ण केला. या तीनही प्रकल्पासाठी त्यांना संशोधन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती. महाराजा सयाजीराव विश्वविद्यालय बडोदा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मुंबई विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, या विद्यापीठाच्या संशोधन आणि मान्यता समितीवर व अभ्यास मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे सध्या ते पैठण येथील संतपीठाच्या अभ्यास मंडळावर कार्यरत आहेत. राज्य मराठी विकास संस्था मुंबई येथे अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. 11वी- 12वीच्या वैकल्पित मराठी पुस्तकाच्या संपादक मंडळात त्यांनी काम केलेले आहे. डॉ. सतीश बडवे यांच्या ग्रंथांना ‘गुरुकुल प्रतिष्ठानचा संत चोखामेळा पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे यांचा विशेष ग्रंथ लेखन पुरस्कार’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा समीक्षा लेखन पुरस्कार’, आणि ‘सर्वोदय साहित्य मंडळाचा साहित्य गौरव पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आलेले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर