ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

तिवळी येथे मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन:गावातील वैद्यकीय सेवेने ज्येष्ठ सुखावले‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | शिरपूर जैन ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने गुरुवारी दि.२८ मे २०२६ रोजी तिवळी येथे भव्य ‘मोफत दंत व त्वचारोग तपासणी शिबिरा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७:३० ते दुपारी १:०० या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि तपासणी शिरपूर येथील सत्यश्री दातांचा दवाखाना व स्किन केअर सेंटरचे मुख्य संचालक डॉ. अक्षय किशोर लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू लाभार्थींची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये दात दुखी, हिरड्यांचे आजार, दातांची स्वच्छता यासोबतच त्वचेचे विकार, ॲलर्जी आणि इतर त्वचाविषयक समस्यांवर रुग्णांना मोफत सल्ला व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक उपक्रमाचे आयोजन ‘मोरया युवा प्रतिष्ठान’ आणि ‘कृषी माऊली शेतकरी समूह, तिवळी’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवा गावातच उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला होता. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोरया युवा प्रतिष्ठान व कृषी माऊली शेतकरी समूहाच्या सर्व सदस्य दिपक शिवाजी बकाल (ग्रा. प. सदस्य) तिवळी, प्रशांत उद्धव बकाल, राहुल भागीरथ लहाने, ऋषिकेश भानुदास बकाल, आशितोष भागवत बकाल, ओम पांडुरंग बकाल, मोहन सातवकर, ओम विष्णू बकाल, परमेश्वर महाराज बकाल, गजानन देशमुख आणि तिवळी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. गावातच दर्जेदार वैद्यकीय सेवा शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक बऱ्याचदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना गावातच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून या शिबिराचे आयोजन केले होते. – दीपक शिवाजी बकाल, ग्रा.पं. सदस्य, तिवळी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर