ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पावसाळ्याच्या तोंडावर संरक्षण भिंतीचे काम सुरु:नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू, कोट्यवधींचा निधी पाण्यात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दिग्रस नगर परिषद हद्दीतील वाल्मिकनगर बायपास आर्णी पुलापासून जुन्या आर्णी पुलापर्यंत सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून “हे बांधकाम नागरिकांच्या सुरक्षेसाठी की भ्रष्टाचारासाठी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. मात्र ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा निधी हडप करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांच्या मते, संरक्षण भिंतीचा पाया अत्यंत कमी खोलीचा खोदण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गाळ आणि कचऱ्यावरच काँक्रीट टाकण्यात येत असल्याने भविष्यात जोरदार पावसात ही भिंत वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. थातूरमातूर खोदकाम, बारीक गज आणि घाईगडबडीत सुरू असलेले काँक्रिटीकरण पाहता हे काम किती टिकाऊ राहणार? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे काम सुरू झाले असते तर पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंत पूर्ण होऊ शकली असती. मात्र आता अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एवढ्या घाईमागचे नेमके कारण काय, असा संशय व्यक्त केला जात आहे. नदीकाठचा परिसर खोदून उघडा टाकल्यामुळे पूरस्थितीत पाणी थेट वस्तीत घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. एखाद्या मोठ्या पुरात संपूर्ण परिसर पाण्याखाली जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचार करायचाच होता तर गरीब नदीकाठच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ का? असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. नागरिकांनी या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कारवाई करावी आणि पावसाळ्यापूर्वी सुरक्षित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर