ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

पांढरकवडा येथील जनतेचा पाणीप्रश्न लागला मार्गी:आ. संजय देरकर यांचा पुढाकार दोन दिवसांत दिलेल्या आश्वासनाची केली पूर्तता‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेल्या पांढरकवडा ग्रामस्थांच्या हाकेला आमदार संजय देरकर यांनी प्रतिसाद देत अवघ्या दोन दिवसांत दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवले आहे. गावात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांच्या कुटुंबांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेत आमदार देरकर यांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले. पर्यायी जलस्रोत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. पांढरकवडा येथे पाण्याचा स्रोत उपलब्ध न झाल्याने शेजारील पिसगाव येथे बोरवेल खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. या बोरवेलला मुबलक पाणी लागल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पांढरकवडा गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. गावातील विहिरी आणि उपलब्ध जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय देरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत आमदारांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तांत्रिक पाहणी करण्यात आली. मात्र पांढरकवडा परिसरात अपेक्षित जलस्रोत उपलब्ध न झाल्याने शेजारील पिसगाव येथे पर्यायी बोरवेल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे बोरवेल मशीन दाखल झाल्यापासून प्रत्यक्ष खोदकाम सुरू होईपर्यंत आणि काम पूर्ण होईपर्यंत आमदार देरकर स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत होते. सुमारे १८० फूट खोलीपर्यंत खोदकाम करण्यात आले. दरम्यान अवघ्या ४० फुटांवरच पाण्याचा स्रोत लागल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्या सीमा येरमे यांनी जनतेच्या समस्यांबाबत आमदारांची संवेदनशीलता आणि तत्परता कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. यावेळी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम बुटे, उपतालुकाप्रमुख देवा बोबडे, युवासेना अध्यक्ष करण किंगरे, बदरुद्दीन काजी, माजी उपसरपंच सुरज बुटे, अशोकराव चापले, मारोती गौरकार, राजू फरताडे, छत्रपती भोयर, जनार्दन उंबरे, दशरथ भोयर, मारुती जरीले, प्रवीण जरीले, शंकर फरताडे, उमेश मिलमिले, धनराज आस्वले, सचिन आस्वले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. पिसगाव येथील बोरवेलला मुबलक पाणी लागल्याने पांढरकवड्याचा पाणीप्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे. आश्वासन अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार संजय देरकर यांचे आभार मानले. पाणी हा प्रत्येक नागरिकाचा हक्क पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. जनतेच्या अडचणी सोडवणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य असून, नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. – आमदार संजय देरकर , वणी विधानसभा क्षेत्र.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर