ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अमरावती जीएमसी हस्तांतरणाचा तिढा कायम:तिसरे वर्ष अडचणीत, डीनला तिन्ही रुग्णालये हवीत; यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक वाटचालीत पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्यापही पूर्णपणे जीएमसी प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे तिसरे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी), वैद्यकीय शिक्षण परिषद आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या दिरंगाईची गंभीर दखल घेतली आहे. इर्विनचा ताबा न घेतल्यामुळे जीएमसीतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी डॉक्टरांना दैनंदिन प्रात्यक्षिके करणे कठीण झाले आहे. यामुळे पुढील सत्रातील प्रवेशावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांनी अमरावतीला जीएमसी मिळाले असले तरी, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वैद्यकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणासाठी जीएमसी मंजूर झाले होते. नियमानुसार, महाविद्यालय सुरू करण्यासाठी इर्विन रुग्णालय जीएमसीच्या स्वाधीन करणे आवश्यक होते. इर्विन प्रशासनाने तयारी दर्शवून लेखी पत्रही दिले आहे, परंतु पूर्ण ताबा अद्याप घेतलेला नाही. जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत यांच्या मते, इर्विनसह जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) देखील जीएमसीला हवे आहे. याउलट, इर्विन प्रशासनाचे म्हणणे आहे की, जीएमसीच्या गरजेनुसार इर्विन पुरेसे असून भविष्यात टप्प्याटप्प्याने डफरीनचा ताबा घेता येईल. त्यांनी ताबा घेण्यासाठी लेखी कळवले आहे. जीएमसीच्या प्राथमिक मागणीनुसार त्यांना ४३० खाटांच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे. इर्विनची सध्याची क्षमता एनएचएमच्या नव्या इमारतीसह ५२७ खाटांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे ते पुरेसे आहे. मात्र, जीएमसी प्रशासनाच्या मते, तिन्ही रुग्णालयांचे हस्तांतरण व्हावे असा सामंजस्य करार (एमओयू) झाल्याने त्यांना ती तिन्ही रुग्णालये हवी आहेत. दरम्यान, काही इमारतींच्या शिफ्टिंगची प्रक्रिया सुरू असली तरी, तांत्रिक अडचणी, अंतर्गत समन्वय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हस्तांतरणाचा हा तिढा अद्यापही कायम आहे. या गुंतागुंतीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधीक्षकांसोबत बैठकांचे सत्र सुरू असून, समन्वयातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर