ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

नाल्याची दुरवस्था; वाल्मिक नगर जलमय:दिग्रस येथील नागरिक त्रस्त, नगर परिषदेला निवेदन, उपाययोजना करण्याची मागणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील वाल्मिकनगर परिसरात नाल्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २३ जून रोजी झालेल्या पावसानंतर नाला तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी थेट वस्तीत शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो. शहबाज मो. अकिल यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. निवेदनानुसार, शंकर टॉकीज परिसर, बाराभाई मोहल्ला आणि शहरातील इतर भागांमधून येणारे पावसाचे व सांडपाण्याचे प्रवाह वाल्मिक नगर येथील नाल्यात मिसळतात. मात्र नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि अतिक्रमणजन्य अडथळे साचल्याने पाण्याचा निचरा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. परिणामी, नाला भरून वाहत असून त्याचे पाणी थेट वाल्मिक पुरा मोहल्ल्यात घुसत आहे. यामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक घरांसमोरील परिसरात पाण्याचे तळे साचले आहेत. दिवाण नगर आणि घंटीबाबा परिसरातील नाल्यांचा निचराही बाधित झाला असून तेथील नाल्या ब्लॉक होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांना दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव, साथीच्या रोगांचा धोका आणि मालमत्तेच्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मो. शहबाज अकिल यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची नियमित साफसफाई व देखभाल झाली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी याच समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत असताना कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवेदनाद्वारे वाल्मिक नगर येथील नाल्याची तात्काळ साफसफाई, गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच शंकर टॉकीज, बाराभाई मोहल्ला व इतर भागांतील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवून भविष्यात वाल्मिक पुरा परिसरात पाणी घुसणार नाही, याची खात्री करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर