ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

आधी पुनर्वसन, मगच कारवाईची मागणी:व्यापाऱ्यांचे प्रशासनाविरोधात आंदोलन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यवतमाळ शहरातील नेताजी मार्केट परिसरातील फुटपाथ व्यापाऱ्यांवर प्रशासनाने उगारलेल्या अतिक्रमण हटावच्या जाचक कुऱ्हाडीविरोधात गुरुवारी संतापाचा ज्वालामुखी फाटला. “आधी पुनर्वसन करा, मगच कारवाईचा हात लावा!” अशी थेट आणि आक्रमक भूमिका घेत शेकडो अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनाच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा तीव्र निषेध करत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात येथील नेताजी मार्केट परिसरातील फुटपाथ व्यापाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चात व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. ”आधी पुनर्वसन, मगच कारवाई” अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. प्रशासनाच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा तीव्र निषेध करत, जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोचार्चे नेतृत्व विदर्भ अन्याय निवारण समिती अध्यक्ष क्रांती धोटे यांनी केले. यावेळी माजी आमदार विजया धोटे, लालजी राऊत, नगरसेवक संतोष बोरले, डॉ. प्रदीप राऊत, श्रीराम खिरेकर, गणेश कोसरकर, तेजस चव्हाण, संजय लोंढे, प्रकाश बत्रा, गणेश बत्रा, भागचंद कुकरेजा, निलेश पाचकवडे, वाहिद अकबानी, राहुल अग्रवाल, शंकर मोकळकर यांच्यासह नेताजी चौक परिसर व अन्यायग्रस्त शेकडो अतिक्रमणधारक तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर