ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

तालुक्यात शेतीशाळांचा धडाकेबाज शुभारंभ

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूल पद्धतींचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष धडे

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव बदलत्या हवामानाच्या आव्हानांवर मात करत शेती उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या पुढाकाराने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीशाळा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ४ जून रोजी वडगाव व हिवरा मजरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

आधुनिक शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती आणि कृषीपूरक व्यवसायांची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत वडगाव येथे आयोजित शेतीशाळेत कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र यवतमाळचे डॉ. देशमुख यांनी कृषीपूरक जोडधंदे व ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना मांडली, तर डॉ. मगर यांनी एकात्मिक पीक संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.

डॉ. झाडोदे यांनी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधला.तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले. मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी फळबाग लागवडीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारस्कर यांनी विषमुक्त शेतीची संकल्पना मांडली, तर सहायक कृषि अधिकारी सुरेखा मेश्राम यांनी बीजप्रक्रिया व उगवणक्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक सादर केले.दरम्यान, हिवरा मजरा येथे महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतीशाळा पार पडली. यामध्ये हवामान अनुकूल शेती, नैसर्गिक निविष्ठांचा वापर, बीजप्रक्रिया, उगवणक्षमता तपासणी तसेच महाविस्तार एआयच्या उपयोगितेवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कृषि अधिकारी (गुणनियंत्रण) सुरेश बुटले यांनी शेतकऱ्यांना प्रतिबंधित HTBt कापूस बियाण्यांपासून सावध राहण्याचा आणि सर्व कृषि निविष्ठा पक्क्या बिलासह खरेदी करण्याचा सल्ला दिला.विशेष म्हणजे, या शेतीशाळेत शेतकऱ्यांनी स्वतः दशपर्णी अर्क तयार केला तसेच रुंद सरी-वरंबा पद्धतीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभवले.

आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगम घडवून आणणाऱ्या या शेतीशाळांमुळे शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि उत्पादनक्षम होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

चौकट

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव व हिवरा मजरा येथील शेतीशाळांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती यामुळे शेतीशाळा ज्ञानाची प्रभावी पाठशाळा ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर